🌼 प्रथम पुण्यस्मरण 🌼
🌼 प्रथम पुण्यस्मरण 🌼 कै. सदाशिव दत्तू सूर्यवंशी (८ एप्रिल २०२५ — स्मृतिदिन: ८ एप्रिल २०२६) प्रिय दादा, आज तुमच्या जाण्याला एक वर्ष पूर्ण झालं… पण खरं सांगू का…? आजही मन त्या काळ्या रात्रीतून बाहेरच आलेलं नाही. ८ एप्रिल २०२५ ची ती पहाट… १२:३० चा तो क्षण… आणि आयुष्यभरासाठी काळजावर कोरलेली ती वेदना… सगळं काही अजूनही जसंच्या तसं जिवंत आहे. दादा, तुमचं जाणं म्हणजे फक्त एक व्यक्ती जाणं नव्हतं… तो माझ्या आयुष्याचा श्वास हरवण्याचा क्षण होता… आधारवड कोसळल्यावर जसं आकाशच रिकामं वाटतं, तसंच काहीसं माझं जग आजही उद्ध्वस्त अवस्थेत उभं आहे. तुम्ही होतात म्हणून मी होतो… तुमच्या सावलीत उभं राहून मी आयुष्याला तोंड देत होतो… तुमचा हात पाठीवर असायचा, म्हणून संकटंही लहान वाटायची… पण आज… तुमच्या त्या हाताशिवाय प्रत्येक क्षण डोंगरासारखा जड वाटतो आहे. तुमचा तो प्रेमळ आवाज… ते दिलखुलास हसणं… आणि “काही होणार नाही” म्हणत दिलेला धीर… दादा, आज सगळंच आठवतं… आणि प्रत्येक आठवण हृदयाला घाव घालते. कधी कधी असं वाटतं… की हे सगळं एक भयंकर स्वप्न आहे… आणि तुम्ही अचानक समोर येऊन म्हणाल - “अरे, मी इथेच आहे!” पण...