पोस्ट्स

🌼 प्रथम पुण्यस्मरण 🌼

इमेज
🌼 प्रथम पुण्यस्मरण 🌼 कै. सदाशिव दत्तू सूर्यवंशी (८ एप्रिल २०२५ — स्मृतिदिन: ८ एप्रिल २०२६) प्रिय दादा, आज तुमच्या जाण्याला एक वर्ष पूर्ण झालं… पण खरं सांगू का…? आजही मन त्या काळ्या रात्रीतून बाहेरच आलेलं नाही. ८ एप्रिल २०२५ ची ती पहाट… १२:३० चा तो क्षण… आणि आयुष्यभरासाठी काळजावर कोरलेली ती वेदना… सगळं काही अजूनही जसंच्या तसं जिवंत आहे. दादा, तुमचं जाणं म्हणजे फक्त एक व्यक्ती जाणं नव्हतं… तो माझ्या आयुष्याचा श्वास हरवण्याचा क्षण होता… आधारवड कोसळल्यावर जसं आकाशच रिकामं वाटतं, तसंच काहीसं माझं जग आजही उद्ध्वस्त अवस्थेत उभं आहे. तुम्ही होतात म्हणून मी होतो… तुमच्या सावलीत उभं राहून मी आयुष्याला तोंड देत होतो… तुमचा हात पाठीवर असायचा, म्हणून संकटंही लहान वाटायची… पण आज… तुमच्या त्या हाताशिवाय प्रत्येक क्षण डोंगरासारखा जड वाटतो आहे. तुमचा तो प्रेमळ आवाज… ते दिलखुलास हसणं… आणि “काही होणार नाही” म्हणत दिलेला धीर… दादा, आज सगळंच आठवतं… आणि प्रत्येक आठवण हृदयाला घाव घालते. कधी कधी असं वाटतं… की हे सगळं एक भयंकर स्वप्न आहे… आणि तुम्ही अचानक समोर येऊन म्हणाल - “अरे, मी इथेच आहे!” पण...

महाडची ऐतिहासिक सांस्कृतिक ओळख जपणारं आराध्य दैवत: श्री विरेश्वर महाराज मंदिर

इमेज
महाडची ऐतिहासिक सांस्कृतिक ओळख जपणारं आराध्य दैवत: श्री विरेश्वर महाराज मंदिर महाड, प्रतिनिधी: सावित्री नदीच्या पवित्र काठावर वसलेलं महाड शहर इतिहास, परंपरा आणि अध्यात्म यांचा संगम म्हणून ओळखलं जातं. या शहराच्या सांस्कृतिक जीवनाचा केंद्रबिंदू मानलं जाणारं श्री विरेश्वर महाराज मंदिर आजही स्थानिकांच्या श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक ऐक्याचं प्रतीक म्हणून उभं आहे. शहराच्या मध्यभागी असलेले श्री विरेश्वर महाराज हे परिसरातील ८४ गावांचे कुलस्वामी मानले जातात. स्थानिक परंपरेनुसार हे दैवत संपूर्ण परिसराचं रक्षण करत असल्याची श्रद्धा आहे. त्यामुळे मंदिराभोवती धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची अखंड परंपरा दिसून येते. गावोगावी पसरलेली देवपरंपरा आजही जिवंत असून, वर्षातून एकदा होणारा छबिना महोत्सव हा या श्रद्धेचा उत्कट आविष्कार मानला जातो. छबिना महोत्सवात विविध देवतांच्या पालख्या वाजत-गाजत मंदिरात दाखल होतात. काही ठिकाणी देवतांच्या प्रतीकात्मक काठ्यादेखील आणल्या जातात. या सोहळ्यादरम्यान परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होतं. हा उत्सव केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता सामाजिक एकात्मतेचा उत्सव ठरत...

महाडचा छबिना: सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा उत्सव

इमेज
महाडचा छबिना: सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा उत्सव महाड: महाशिवरात्रीपासून सुरू झालेला श्री देव विरेश्वर महाराज मंदिर येथील पारंपरिक छबिना उत्सव शहरात भक्तिभाव, उत्साह आणि सामाजिक ऐक्याचे अनोखे वातावरण निर्माण करत आहे. भव्य, पवित्र आणि रोमांचक स्वरूपाच्या या उत्सवासाठी परिसरातील गावोगावचे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून मंदिर परिसर सतत गर्दीने फुलून गेला आहे. उत्सवानिमित्त नातेवाईक, मित्रपरिवार आणि कुटुंबीय एकत्र येत असल्याने देवदर्शनासोबतच गाठीभेटी, विचारपूस आणि सामाजिक संवादाला नवी उभारी मिळत आहे. या निमित्ताने समाजातील ऐक्य दृढ होत असून परंपरा आणि आधुनिक सामाजिक नातेसंबंध यांची सुंदर सांगड घातली जात आहे. मंदिरात समया लावून शिवपिंडीवर देवाचा मुखवटा प्रतिष्ठापित करण्यात आला आहे. भजन-कीर्तनाच्या सुरांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. एकादशी निमित्त दीप पूजन, बैठक, गादी पूजन, वही पूजन, प्रधान कलश पूजन आणि गणेश पूजन विधिवत पार पडले. देवळातील सर्व देवदेवतांना हार, फुले व फळे अर्पण करून गाऱ्हाणे घालण्यात आले. श्री देव विरेश्वर महाराजांव...

सोशल मीडिया: घरबसल्या कमाईचे एक आधुनिक आणि प्रभावी साधन

इमेज
सोशल मीडिया: घरबसल्या  कमाईचे एक आधुनिक आणि प्रभावी साधन आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे फक्त संवादाचे माध्यम राहिलेले नाही, किंवा त्याकडे केवळ फालतू टाईमपास म्हणून बघण्यापेक्षा त्यातून बक्कळ कमाई करता येते हे समजून घेणं आवश्यक आहे. सोशल मीडिया कमाईचे एक आधुनिक आणि प्रभावी साधन बनले आहे. जवळपास प्रत्येक हातात मोबाईल आहे. मोबाईलचा सुयोग्य वापर केल्यास प्रचंड कमाईचं साम्राज्य उभा करता येतं. सोशल मीडिया म्हणजे नवनवीन संधीचं दालन. आजच्या काळात सर्वात स्वस्त आणि प्रभावी मार्केटिंग टूल ठरलं आहे. डिजिटल स्कील शिकणं म्हणजे स्वतः मध्ये गुंतवणूक करणं जी तुम्हाला नक्कीच परतावा देते. आधुनिक तंत्रज्ञान आणि सोशल मीडियामुळे जग आपल्या कवेत आणि मुठीत आले आहे. आज जवळजवळ प्रत्येकाकडे मोबाईल आणि इंटरनेट आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, एक्स (ट्विटर), लिंक्डइन किंवा अगदी व्हॉट्सअपवरूनही अनेकजण स्वतःचा व्यवसाय, ब्रँड किंवा कला जगभर पोहोचवत आहेत. १. सोशल मीडिया म्हणजे संधींचं जग- पूर्वी व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठा खर्च आणि बाजारपेठ लागायची. पण आज सोशल मीडिया तुमची मोफत बाजारपेठ आहे. तुम...

💐 ५ वे पुण्यस्मरण 💐

इमेज
💐🙏 पाचवे पुण्यस्मरण 🙏 💐 कै. दत्तू बाबू सूर्यवंशी (दि. १३ ऑक्टोबर २०२०) प्रिय बाबा, तुम्ही आम्हाला सोडून देवाघरी गेल्याला ५ वर्षे पूर्ण झाली, पण तुमच्या आठवणींचा सुगंध आजही आमच्या जीवनात  दरवळत आहे. कुटुंबाचा आधारवड हरवला हे दुःख अजूनही मनाला चटका लावून जाते. तुमचं संपूर्ण आयुष्य म्हणजे... कष्ट, संघर्ष आणि जिद्दीचं जिवंत उदाहरण होतं. तुम्ही शिकवलं - संघर्षाला कधीही घाबरू नका, सत्य आणि प्रामाणिकतेचं शस्त्र हातात घेऊन आयुष्य जगायचं, आणि कोणत्याही परिस्थितीत शांतता राखायची. कष्टाची भाकरी खायची. आयुष्याच्या रणभूमीतून कधीही पळ काढायचा नाही. तुमचे संस्कार, शिकवण आणि आदर्श हा आमचा सर्वात मोठा वारसा आहे. आणि आम्ही तो आयुष्यभर जपत राहू.  शरीराने तुम्ही आमच्यात नसला, तरी विचारांनी, शिकवण आणि प्रेमाने तुम्ही सदैव आमच्यात जिवंत आहात. बाबा आपल्या आत्म्यास शांती लाभो, आणि आपले आशीर्वाद आमच्यावर सदैव राहोत, हीच आमची मनःपूर्वक प्रार्थना. 🌹 संपूर्ण सूर्यवंशी परिवाराकडून विनम्र श्रद्धांजली 🌹 आपला सुपुत्र -  संभाजीराव सूर्यवंशी 🥹

देवाची योजना: अज्ञात, कडू, गोड पण शेवटी आपल्या भल्यासाठीच असते...!

देवाची योजना – अज्ञात, कडू, गोड पण शेवटी आपल्या भल्यासाठीच असते.!  माणसाचं आयुष्य अनाकलनीय, अकल्पित, गूढ आणि रहस्यमय असतं. त्याच्या आयुष्यात कधी काय घडेल सांगता येतं नाही.  माणूस हा झाडावरून गळालेल्या शुष्क पानासारखा असतो. नशिबाचा  वारा सुटला तर ते पान उंच पर्वताच्या शिखरावर पोहचते किंवा एखाद्या खोल दरीत पडून कुजून जातं. कदाचित ते निर्जीव पान समुद्राच्या लाटेवरून ऐलतीरावरून पैलतीरापर्यंत सुखरूप जाऊ शकतं किंवा एखाद्या अग्निकुंडात सापडून जळून खाक होतं. नशिबाची साथ लाभली तर ते पान पंख फुटलेल्या पक्ष्यासारखं आकाशात घिरट्या घालतं आणि नशिबाची साथ नाहीच लाभली तर ते पान मातीमोल होऊन जातं. माणसाचंही असंच होतं.  नशिबाची साथ लाभली तर माणूस कुठच्या कुठे पोहचू शकतो.  नशिबापुढे आपण सगळेच हतबल ठरतो.  आपल्या आयुष्यात अनेक वेळा अशा घटना घडतात, ज्या आपण अपेक्षितच केलेल्या नसतात. कधी काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडतात, तर कधी अगदी उलट. त्या वेळी आपण देवावर रागावतो, निराश होतो, प्रश्न विचारतो — “हे माझ्यासोबतच का?” पण थोडा काळ गेला की लक्षात येतं — देवाची प्रत्येक योजना आपल्य...

आईवडिलांची आर्त साद: चिमण्यांनो परत फिरा रे...!

आई वडिलांची आर्त साद:  चिमण्यानो परत फिरा रे...! आई-वडील आपल्यासाठी आयुष्यभर झिजतात, आपल्या प्रत्येक यशात आनंदून जातात, स्वतःच्या आकांक्षा बाजूला ठेवून, आपलं आयुष्य आपल्या सुखासाठी खर्ची घालतात. त्यांचा त्याग आणि समर्पित वृत्ती शब्दांत न मावणारी आहे.  पोटाला चिमटा लावून मुलांचे हट्ट पुरवणारे, त्यांच्या भविष्यासाठी स्वप्नं बघणारे. त्यांच्या प्रत्येक थकलेल्या श्वासात एकच मागणी — "माझी मुलं सुखी असावीत..." देवाकडे स्वतःसाठी काहीही मागत नसतात. जे काही मागायचे ते केवळ मुलांसाठी.  पण आज... तेच आईवडील एकटे पडले आहेत. केस गळलेत, दात पडलेत, डोळ्यांची नजर मंदावलीय... पण मुलांची आणि नातवंडांची वाट पाहणं मात्र काही थांबलेलं नाही. ज्यांचं आयुष्य मृत्यूच्या अगदी जवळ आहे असे आईवडील मुलाबाळांची वाट पाहतायत. त्यांच्या आयुष्याचा सूर्य कधी मावळेल सांगता येत नाही. आज मावळलेला सूर्य दुसऱ्या दिवशी उगवतोच. पण एकदा का आईवडील आपल्याला सोडून गेले तर... ते पुन्हा कधीही भेटणार नाहीत. दिसणार नाहीत. मित्रांनो, ईवडील वाट पाहत आहेत तुमच्या एका फोनची, एका भेटीची, एका प्रेमाच्या मिठीची! घराच्या भिंतीशीच त...