आईवडिलांची आर्त साद: चिमण्यांनो परत फिरा रे...!
आई वडिलांची आर्त साद: चिमण्यानो परत फिरा रे...! आई-वडील आपल्यासाठी आयुष्यभर झिजतात, आपल्या प्रत्येक यशात आनंदून जातात, स्वतःच्या आकांक्षा बाजूला ठेवून, आपलं आयुष्य आपल्या सुखासाठी खर्ची घालतात. त्यांचा त्याग आणि समर्पित वृत्ती शब्दांत न मावणारी आहे. पोटाला चिमटा लावून मुलांचे हट्ट पुरवणारे, त्यांच्या भविष्यासाठी स्वप्नं बघणारे. त्यांच्या प्रत्येक थकलेल्या श्वासात एकच मागणी — "माझी मुलं सुखी असावीत..." देवाकडे स्वतःसाठी काहीही मागत नसतात. जे काही मागायचे ते केवळ मुलांसाठी. पण आज... तेच आईवडील एकटे पडले आहेत. केस गळलेत, दात पडलेत, डोळ्यांची नजर मंदावलीय... पण मुलांची आणि नातवंडांची वाट पाहणं मात्र काही थांबलेलं नाही. ज्यांचं आयुष्य मृत्यूच्या अगदी जवळ आहे असे आईवडील मुलाबाळांची वाट पाहतायत. त्यांच्या आयुष्याचा सूर्य कधी मावळेल सांगता येत नाही. आज मावळलेला सूर्य दुसऱ्या दिवशी उगवतोच. पण एकदा का आईवडील आपल्याला सोडून गेले तर... ते पुन्हा कधीही भेटणार नाहीत. दिसणार नाहीत. मित्रांनो, ईवडील वाट पाहत आहेत तुमच्या एका फोनची, एका भेटीची, एका प्रेमाच्या मिठीची! घराच्या भिंतीशीच त...