पोस्ट्स

जुलै, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माणूस चंद्रावर आणि मंगळावर पोहचला पण...

इमेज
माणूस चंद्रावर आणि मंगळावर पोहचला पण... "कोट्यवधी मैलांवरील तारे, उपग्रह पाहण्यासाठी मानवाने दुर्बीण बनवली खरी... पण शेजारी बसलेल्या माणसाच्या मनात नेमके काय चालले आहे हे शोधून काढणारी दुर्बीण मात्र माणूस बनवू शकला नाही." माणूस पोहोचला ताऱ्यांपर्यंत, उपग्रहांपर्यंत… पण मनाच्या अंतराळात अजूनही भरपूर अंधार आहे! आज विज्ञानाच्या प्रगतीने आपण कोट्यवधी मैलांवरील ताऱ्यांपर्यंत पोहोचलो आहोत. दुर्बिणीच्या साहाय्याने आपण आकाशाचे रहस्य शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण चंद्रावर पाऊल टाकले, मंगळावर मोहीम पाठवली… पण अजूनही एक जागा आहे, जिथे आपण पोहोचू शकलो नाही ती म्हणजे माणसाचे मन. आकाशा पेक्षा कितीतरी विस्तृत, पॅसिफिक समुद्रापेक्षा किती तरी सखोल, विमानापेक्षा किती तरी पटीने वेगाने धावणारे मन माणसाला लाभले आहे ज्याचा थांगपत्ता कुणाला लागुच शकणार नाही.  आपण यंत्रं, तंत्रज्ञानं आणि नवनवीन साधनं निर्माण केली. अदृश्य पाहिलं, अमाप मोजलं… पण आजवर असं कोणतंही उपकरण निर्माण झालेलं नाही, जे आपल्यासमोर बसलेल्या माणसाच्या मनात काय चालले आहे हे समजू शकेल. ज्ञान वाढलं… पण संवेदनशीलता हरवली!...

आजच्या शिक्षण क्षेत्रातील सोशल मिडियाची भूमिका

इमेज
"आजच्या शिक्षण क्षेत्रातील सोशल मिडियाची भूमिका" सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. आजच्या डिजिटल युगात सोशल मिडिया केवळ गप्पा मारण्याचे किंवा फोटो शेअर करण्याचे माध्यम राहिलेले नाही, तर ते एक महत्त्वाचे शैक्षणिक साधन बनले आहे. युट्यूबवरील शिकवण्या, शैक्षणिक रील्स, ऑनलाइन चर्चासत्रे अशा अनेक माध्यमांमुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संवाद व शिक्षण पद्धती मध्ये कमालीचे बदल होत आहेत. १. अमर्याद ज्ञानाचा स्रोत-  YouTube, Instagram, आणि LinkedIn यांसारख्या प्लॅटफॉर्म्सवर विद्यार्थ्यांना ज्ञान, माहिती सहजपणे मिळते. विषयानुसार शिकवण्या, प्रेरणादायक व्याख्याने, करिअर मार्गदर्शन, इंग्रजी भाषा सुधारण्यासाठी टिप्स, रेसिपी, व्यक्तिमत्त्व विकास , आरोग्यविषयक सल्ले आणि बरेच काही. म्हणजेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यालाही आता घरबसल्या तंत्रज्ञान, विज्ञान, गणित, इंग्रजी किंवा परदेशी भाषा  शिकता येते. २. विद्यार्थी–शिक्षक संवाद सुलभ-  Google Classroom, WhatsApp, किंवा Facebook Groups यांद्वारे: शिक्षक वेळेवर सूचना, अभ्यासक्रम किंवा होमवर्क शेअर करू शकतात. विद्यार्थी ...