आजच्या शिक्षण क्षेत्रातील सोशल मिडियाची भूमिका

"आजच्या शिक्षण क्षेत्रातील सोशल मिडियाची भूमिका"
सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. आजच्या डिजिटल युगात सोशल मिडिया केवळ गप्पा मारण्याचे किंवा फोटो शेअर करण्याचे माध्यम राहिलेले नाही, तर ते एक महत्त्वाचे शैक्षणिक साधन बनले आहे. युट्यूबवरील शिकवण्या, शैक्षणिक रील्स, ऑनलाइन चर्चासत्रे अशा अनेक माध्यमांमुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संवाद व शिक्षण पद्धती मध्ये कमालीचे बदल होत आहेत.

१. अमर्याद ज्ञानाचा स्रोत- 
YouTube, Instagram, आणि LinkedIn यांसारख्या प्लॅटफॉर्म्सवर विद्यार्थ्यांना ज्ञान, माहिती सहजपणे मिळते. विषयानुसार शिकवण्या, प्रेरणादायक व्याख्याने, करिअर मार्गदर्शन, इंग्रजी भाषा सुधारण्यासाठी टिप्स, रेसिपी, व्यक्तिमत्त्व विकास , आरोग्यविषयक सल्ले आणि बरेच काही. म्हणजेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यालाही आता घरबसल्या तंत्रज्ञान, विज्ञान, गणित, इंग्रजी किंवा परदेशी भाषा  शिकता येते.

२. विद्यार्थी–शिक्षक संवाद सुलभ- 
Google Classroom, WhatsApp, किंवा Facebook Groups यांद्वारे:
शिक्षक वेळेवर सूचना, अभ्यासक्रम किंवा होमवर्क शेअर करू शकतात. विद्यार्थी कुठल्याही वेळेस प्रश्न विचारू शकतात. मित्रांमध्ये ग्रुप डिस्कशन होऊ शकते. हा संवाद वर्गाच्या बाहेरही कायम राहतो. व्याख्याने परत परत वाचू, ऐकू शकता. केव्हाही आणि कोठेही राहून शिकण्याची प्रक्रिया चालू ठेवता येते.

३. सर्जनशील शिक्षण व अभिव्यक्ती- 
सोशल मिडियामुळे  निर्मितीक्षम शिक्षणास प्रोत्साहन मिळते. विद्यार्थी स्वतः शैक्षणिक सामग्री तयार करतात: माहितीपट, व्हिडीओ, ब्लॉग इत्यादी. Canva, Instagram सारख्या साधनांद्वारे कठीण संकल्पना सोप्या पद्धतीने सादर करता येतात. कथाकथन, रील्स, मीम्सद्वारे शिकणे अधिक रंजक बनते

४. जागतिक स्तरावरील संधी- 
सोशल मिडियामुळे विद्यार्थ्यांना देश विदेशात संधी /नोकरी मिळते. आंतरराष्ट्रीय वेबिनार्स, मोफत ऑनलाइन कोर्सेस, विविध देशांतील अभ्यासगटांमध्ये सहभाग यामुळे त्यांचा दृष्टीकोन जागतिक स्तरावर पोहोचतो. लोकल ते ग्लोबल स्तर गाठता येतो. 

५. शिस्त आणि डिजिटल साक्षरतेची गरज- 
सोशल मिडिया शिक्षणात उपयोगी असले तरी काही जोखमीही असतात हे विसरून चालणार नाही. अभ्यासावेळी विचलित होणे, चुकीची किंवा अपूर्ण माहिती मिळणे, सायबर सुरक्षा आणि ऑनलाइन आचारसंहिता पाळणे, त्यामुळे शाळांमध्ये डिजिटल साक्षरतेचे शिक्षण आवश्यक आहे.

निष्कर्ष- 
सोशल मिडिया योग्य पद्धतीने वापरल्यास, हे शिक्षणासाठी एक सशक्त आणि प्रभावी माध्यम ठरते. विद्यार्थी अधिक वेगाने शिकू शकतात, चांगले कनेक्ट होतात, आणि व्यापक विचार करू शकतात. गरज आहे फक्त योग्य वापराची आणि संतुलन ठेवण्याची.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ज्ञान हेच खरे अक्षय्य आणि अमूल्य धन

सोशल मीडिया: घरबसल्या कमाईचे एक आधुनिक आणि प्रभावी साधन

काम करा बुद्धीने आणि जीवन जगा शुद्धीने